छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर पोलिसांची धडक कारवाई: 409 किलो गांजा जप्त, पाच तस्करांना अटक

NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Published by : Shamal Sawant

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी धडक कारवाई करत तब्बल 409 किलो गांजा व एकूण 1 कोटी 40 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पाच तस्करांना अटक करण्यात आले असून, प्रकरणी NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 01 मे रोजी, सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांना दाभाडी शिवारातील गट नंबर 82 येथील नशीबखाँ पठाण यांच्या शेतातील घरात गांजा साठवण्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड आणि पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तातडीने सापळा रचून छापा टाकला.

छाप्यात ४०९ किलो गांजा (एकूण अंदाजे किंमत ₹1.22 कोटी) तसेच तस्करीसाठी वापरलेली महिंद्रा थार (MP-10 ZD-7222) अंदाजे 18 लाख रुपये किंमतीची वाहन जप्त करण्यात आली.

अटक केलेले आरोपी:

१. नशीबखाँ सांडेखाँ पठाण (42 ), रा. कुंजखेडा, ता. कन्नड

२. इग्राण लियाकत खाँन (38), रा. वालसमद, जि. खरगोन, मध्यप्रदेश

३. मुक्तीयार मुसा खौन (45), रा. वालसमद, जि. खरगोन, मध्यप्रदेश

४. विजय रामचंद्र नाहर (38), रा. आस्का, जि. गजम, ओडिशा

५. रामकृष्ण हरकीत नायक (32), रा. वावनगंजम, जि. गंजम, ओडिशा

पोलीस निरीक्षक आर.बी. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. या घटनेमुळे जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी मोहिमेस मोठे यश मिळाले असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Aajcha Suvichar - आजचा सुविचार

Raj Thackeray : "गोळीबार करून मराठी माणसाला...", 'त्या' घटनेवरुन राज ठाकरे यांचा संताप

Raj Thackeray : "तर कानाखाली बसणारच...", राज ठाकरेंचा कडक इशारा

Latest Marathi News Update live : राज ठाकरे यांचं निशिकांत दुबेला खुलं चॅलेंज